कल्याण लोकसभेत खान्देशी समाजाचा डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा!
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या सदस्यांनी भेट घेत जाहीर केला पाठिंबा!
डोंबिवली – कल्याण लोकसभेत खान्देशी बांधव मोठ्या संख्येने वास्तव्याला असून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या सदस्यांनी आज कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला.
कल्याण लोकसभेत जवळपास ८ ते १० हजार खान्देशी कुटुंबे वास्तव्याला आहेत. या खान्देशी समाजाच्या पोटजातींच्या २२ संघटना असून या सर्व संघटनांचे नेतृत्व उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ करते. या मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी शिष्टमंडळासह खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची डोंबिवलीत भेट घेत त्यांना आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. यावेळी खान्देश भवन उभारणे, तसेच मुंबई भुसावळ रेल्वे गाड्या सुरू करणे अशा काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली.
यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत केलेल्या विविध विकासकामांची त्यांना माहिती दिली, आणि येत्या २० मे रोजी मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार आवर्जून बजावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, ए. जी. पाटील नाना सूर्यवंशी, सुनील चौधरी, रवी पाटील, मगन सूर्यवंशी, अनिरुद्ध चव्हाण, लालचंद पाटील, श्री. इंगळे, उज्ज्वला पाटील यांच्यासह भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह खान्देशी बांधव उपस्थित होते.